"एतस्मिन्नंतरे तत्र शालिवाहनभूपतीः|
एतस्मिन्नंतरे तत्र शालिवाहनभूपतीः|
विक्रमादित्य पौत्रश्च पितृराज्य प्रपेदिरे|
जित्वा शकान् दुराधर्षान् चीनतैत्तिरीदेशजान् |
बाल्हिकान् कामरूपांश्च रोमजान्खुरजान् शठान्|
तेषाम् कोषान् गृहित्वा च दंड योग्यानकारयत् |
स्थापिता तेन मर्यादा म्लेंच्छाणीया पृथक पृथक |
म्लेंच्छस्थानम् परं सींधो कृतम् तेन महात्मना |"
एतस्मिन्नंतरे तत्र शालिवाहनभूपतीः|
विक्रमादित्य पौत्रश्च पितृराज्य प्रपेदिरे|
जित्वा शकान् दुराधर्षान् चीनतैत्तिरीदेशजान् |
बाल्हिकान् कामरूपांश्च रोमजान्खुरजान् शठान्|
तेषाम् कोषान् गृहित्वा च दंड योग्यानकारयत् |
स्थापिता तेन मर्यादा म्लेंच्छाणीया पृथक पृथक |
म्लेंच्छस्थानम् परं सींधो कृतम् तेन महात्मना |"
-भविष्यपुराण
याचाच अर्थ कि १०००-२००० वर्षांपूर्वीपर्यंत आपण 'सिंधू'/'सिंधुस्थानी' म्हणूनच ओळखले जात होतो. म्हणून हिंदू ही संज्ञा त्या सर्वांना लागू होते ज्यांचा जन्म भारतातील आहे- 'तं वर्षं भारतं नाम भारती यत्र संततीः|' जो कोणी स्वतःला या माता भारती चा पुत्र समजतो तो तो हिंदू आहे. हीच पवित्र, जाणीव आजवर या सिंधुस्थानाला एकत्र बांधून आहे व याच विचारसरणीला धरूनच आपल्याला आपले स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या, जाचक परकिय आक्रमणांपासून निभावून नेता येईल अन्यथा नाही.
जसा देव, तसाच देश! जसा धर्म, तसेच राज्य! स्वराज्य स्थापन केल्याशिवाय काही आपल्याला निश्चिंतपणे स्वधर्माचे पालन करता येणार नाही. म्हणून राज्य हे स्वराज्यच असावे, हेच आपले वेद सांगतात, आपली पुराणे हाच इतिहास टाहो फोडून गातात, हाच ऐश्वर्ययोग आपल्याला शास्त्रांमधून शिकवला आहे.
सिंधुस्थानाचा इतिहास चाळला तर असा विचार येतो की कदाचित हिंदूंची एकराष्ट्रीयत्वाची भावना अधिक दृढ होण्यासाठीच की काय परचक्र सिंधुस्थानाच्या उत्तर दरवाजावर घोंघावू लागले. एकदा, दोनदा नाही तर शेकडो वेळा म्लेंछांनी म्हणजे परकियांनी भारतावर ले व प्रत्येक पराभवानंतर ही सिंधुभूमी पुनःश्च पूर्वीपेक्षा अपमाने प्रतिकारासाठी सज्ज होऊन उभी राहिली. हाच सोनेरी इतिहास आपण थोडक्यात पाहू.
सोनेरी? होय, सुवर्णमयी इतिहास ! इंग्रजांच्या कृपाशिर्वादामूळे आपल्यापैकी कित्येक हिंदू आपला सुवर्ण इतिहास विसरले, परंतु तो खऱ्या हिंदू राष्ट्रवाद्यांनी तो आपल्या हृदयात कोरून ठेवला आहे. बलाढ्य मेसेडोनियन आक्रमणकर्ता अलेक्झांडरला त्याच्या सैन्यासह चित केले ते एका चंद्रगुप्त-चाणक्य या गुरूशिष्यांच्या जोडीने ! हे आपल्या अर्वाचीन इतिहासातील पहिले सोनेरी पान ! पुढे अशोकाने बुद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर भारतात नपुंसकता वाढीस लागली हे पाहून यवनांनी पुनःश्च आक्रमण केले , तेव्हा सिंधुस्थानातील अन्य हिंदू राजांचे समर्थन मिळवून, नपुंसक मगधेश अशोकपुत्राचा वध करून, मगधाचा राज्यकारभार आपल्या विवेकी, संयमी, तेजस्वी हातात घेऊन आततायी यवनांना मगधापर्यंत अडवून धरणारा आमचा हिंदू मगधसम्राट पुष्यमित्र ! पुढे शक-कुशाणांच्या टोळीच्या टोळी रानटी टोळधाडींप्रमाधे उत्तरेत हिंदवी रक्ताची होळी खेळू लागल्या, तेव्हा त्यांनादेखील दंडकारण्यापर्यंत पोचण्यापासून थोपवून धरले ते आपल्या पाटलीपूत्रातील गुप्त वंशाच्या सम्राट दुसरा चंद्रगुप्त म्हणजेच सम्राट विक्रमादित्य याने ! हा शक-हूणांच्या मर्दनाचा इतिहास म्हणजे आपल्या इतिहासातील तिसरे सोनेरी पान ! पुढे पुन्हा कित्येक वर्षे शांततेचा उपभोग घेतल्यानंतर एकाएकी शक-कुशाणांप्रमाणेच रानटी, क्रूर हूणांच्या धाडीवर धाडी आर्यांच्या पवित्र प्रदेशात मुसंडी मारू लागल्या. उत्तरेचा बहुत भाग या हूणांनी व्यापल्यावर भारतभूमीचा कोणी वाली राहिला नाही अशी अवस्था बनल्यावर या सिंधू रक्षणार्थ धावला तो मालव प्रांताचा हिंदू राजा यशोधर्मा ! अन्य हिंदू राजांच्या सहमतीने त्यांचे नेतृत्व स्विकारून सम्राट यशोधर्म्याने हूणांचा नायनाट केला. हे होते आपल्या इतिहासाचे चवथे सोनेरी पान !
पुढील पाचवे सोनेरी पान फार प्रदिर्घ असून आत्मसंरक्षणासाठी दिलेल्या झुंजीची एक महान गाथाच आहे. या यज्ञात कितीतरी आहुती दिल्या गेल्या, जितक्या आहुती दिल्या गेल्या तितक्याच हिंदूराष्ट्रभक्तांच्या पवित्र रक्ताचे हविर्द्रव्य यात समर्पित झाले. परंतु अंततोगत्वा हा यज्ञ 'हिंदूपदपादशाही'चे व्रत घेतलेल्या दिक्षित मराठा ब्राह्मणांकरवी पूर्ण झाला. होय आम्ही त्या अरबी, पठाणी, इराणी, मुघल, तुर्की, निजामी मुसलमानांशी आपल्या पूर्वजांनी केलेल्या धार्मिक युद्धाचीच गोष्ट करत आहोत. या सिंधूराष्ट्राला तपश्चर्येच्या अग्नीत नियतीने झोकून देऊन प्रथम आहुती स्विकारली ती सिंध प्रांतातील राजा दाहिर याच्या हस्ते ! त्यानंतर राजा जयपाल-अनंगपाल, पुढे सोमनाथावर जेव्हा धर्मांध आक्रमणे झाली, तेव्हा तर सबंध गुजरात-सौराष्ट्रातील हजारो-लाखो हिंदू वीरांनी स्वतःला या पवित्र यज्ञात हविर्द्रव्य म्हणून समर्पित केले की जेणेकरून यज्ञातील देशभक्तिरूपी अग्नीपुरूष अधिक प्रज्वलित झाला. पुढे पृथ्वीराज चौहान या रजपूत राजाने मोहम्मद घोरी व त्याच्या सैन्याच्या अनेकदा दिलेल्या आहुत्या, पुढे चित्तोडची राणी करुणादेवी, देवगिरीचा राजा रामदेवराय, रतनभोरचे रजपूत राजे, चित्तोडची राणी पद्मिनी यांनी अल्लाउद्दीन खिलजीविरुद्ध झुंजत स्वतः अर्घ्य होऊन या यज्ञात आत्मार्पण केले, कालांतराने मूळ हिंदू असलेले नसिरुद्दिन व देवलदेवी यांनी तर २ वर्षासाठी का होईना पण हिंदू राजवट पून्हा स्थापन केली पण इतर हिंदू राजांच्या राजद्रोहामुळे हा यज्ञ अपूर्ण राहिला आणि या धर्मरक्षकांनी आपल्या तेजाचे हविर्द्रव्य स्वातंत्र्याच्या पवित्र यज्ञात अर्पिले, पूढे रजपूत राजे राणा कुंभ, राणा संग, राणा उदयसिंग, महाराणा प्रताप यांनी प्रयत्नांची शिकस्त करून हिंदुत्वाचा यज्ञाग्नी आपल्या हविर्द्रव्याने नित्य तेवत ठेवला. त्याच समयी विजयनगरमध्ये नृसिंहोपासक हरिहर-बुक्क यांनी बळकट हिंदवी राज्य स्थापले. याच विजयनगरने पुढे राजा कृष्णदेवराय, राजा रामराय सारखे वीरोत्तम, धर्मधुरंधर जन्माला घातले, त्यांनी प्राणज्योत मालवेस्तोवर कितीतरी मुसंड्यांच्या आहुत्या देत यज्ञाग्नी धगधगता ठेवला. पुढे दख्खनच्या पवित्र भूमीत जेथे राजा राममदेवरायाच्या कालावधीपासून सतत संतांची मांदियाळी अवतरत राहिली, त्याच धर्मभूमीमध्ये राजा शिवाजी साक्षात शिवाचा सजीव पुतळा अवतरित झाला. 'परित्राणाय साधूनाम् | विनाशाय च दुष्कृताम् |' हे भगवत वचन सार्थ करण्यासाठी! निजामशाही, कुतुबशाही, दिल्लीचे मुघल यांना शिवाजी व शिवाजीनंतर महराष्ट्राचे पंतप्रधान थोरले बाजीराव, माधवराव, नाना-भाऊ पेशवे यांनी व यांच्या अनेकोनेक मातब्बर मराठीसरदारांनी जेरीस आणले व नाममात्र सुलतान बनवून ठेवले. पुनः हिंदवी स्वराज्य स्थापले ते अगदी अटकेपर्यंत ! समकालीन रजपूत राजा छत्रसाल यानेही या यज्ञात कित्येक आहुत्या देत व स्वतःचे रक्त हविर्द्रव्य म्हणून अर्पून आपले योगदान दिले. हे होते ते इतिहासाचे प्रदिर्घ पाचवे सोनेरी पान ! यानंतर सिंधुस्थानाला सामना करावा लागला तो इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगाल राजवटींचा! खरंच वाटते भगंवताला सबंध भारतवासीयांचीच परिक्षा घ्यावयाची होती की काय, म्हणून स्वातंत्र्याच्या यज्ञात कित्येक राजांनी हविर्द्रव्य अर्पिले असूनही यज्ञदेवता प्रसन्न झाली नाही, त्यासाठी प्रत्येक हिंदूकडून आहुत्या व स्वतःचे प्राणार्पण अपेक्षित होते. इंग्रज आणि पोर्तुगीजांविरुद्धच्या या संघर्षात प्रत्येक भारतीय रजपूत योद्धा होऊन तर कधी प्रत्यक्ष भगवान नृसिंह होऊन लढला आणि अडिचशे वर्षांच्या प्रदिर्घ संघर्षानंतर भरतभूमीने मुक्तीचा सूर्य पाहिला. हे होते हिंदुस्थानच्या अर्वाचीन इतिहासातले सहावे सोनरी पान !
आपण पाहिलेत , कसे एका राष्ट्रियत्वाच्या भावनेने आपले भिन्न-भिन्न जाती-धर्माचे, वंशाचे, घराण्याचे पूर्वज एकराष्ट्रीयत्वाच्या भावनेने जगले आणि दुसऱ्या बांधवांचे दुःख कमी व्हावे म्हणून नेहमी स्वतः लढून एकतर शत्रूचा बळी घेतला किंवा स्वतः स्वातंत्र्याच्या प्रज्वलित अग्नीत उडी घेतली. हे सारे घडले ते केवळ 'हिंदुइझम्' या एका शब्दाने अभिप्रेत होणाऱ्या हिंदू वैदिक धर्मासाठी नव्हे, तर हिंदुस्थानच्या संस्कृतीचे ऐक्य, सुखी नागरी जीवन अखंड टिकवून ठेवता यावे यासाठी, हिंदुस्थानचे वैभव, मान-मर्यादा तशीच टिकून रहावी याकरता ! अहो जो या मातीला आपली आई मानत नाही तो काय अभय देणार येथील संस्कृतीला, येथील प्रजेला ! जेथे आत्मीयता नाही, तेथे लुटालूटचीच भावना उत्पन्न होणार व बळावणार ! म्हणूनच जो जो या भारती मातेला आपली जननी मानून या मातेसाठी व तिच्या निरागस पौत्रांसाठीतळमळतो, तो हिंदू! हा आमचा बाणा म्हणजे हिंदुत्व ! भारतात राहून तालिबानशी आपलेपणा म्हणजे मानवतेशी शत्रूता बाळगणाऱ्याला आम्ही हिंदू म्हणवून घेणार नाही, भले तो कोणत्याही जाती, धर्म, वंश , घराण्याचा का असेना !
संदर्भ ग्रंथ : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व आणि सहा सोनेरी पाने