देव-धर्माविषयी जागरुक असणारा हिंदू राष्ट्रधर्माविषयी काही तेवढा जागरुक दिसत नाही. वास्तविक साधी गोष्ट आहे की राष्ट्र आपुले नसले तर कोण आपला देव-धर्म पाळू देईल का ? पण ५००० वर्षांच्या अनुभवातूनही हिंदू काही शिकला नाही. हिंदू धर्मावर बौद्ध राज्यकर्त्यांनी केलेला अत्याचार, त्यानंतर ग्रीक असो की शक, हुण, कुशाण असो की मुसलमान ! साऱ्यांनीच हिंदूंच्या धर्मावर हल्ला चढवला. ब्राह्मणांना तर जिवंत जाळण्याइतपत कृत्ये झालीत मग तेथे सेवकांचे काय हाल, स्त्रीयांचे तर हाल विचारूच नका. मुसलमानांनी किती स्त्रीयांना पळवलं, लुटलं, चिरडलं काही गणनाच नाही. काही जास्त नाही , २५० वर्षांपुर्वीच्या या गोष्टी. तरी आज आपण विसरलो आणि कश्मीर मध्ये भारताचा झेंडा जाळला जातो, पाकिस्तान जिंदाबाद चे नारे लावले जातात आणि आपण निष्क्रीय ! सरकार कश्मीर मध्ये पाऊल टाकायलासुद्धा घाबरते का ? माझ्या आईचे मस्तक उडवले गेले, तरी काय माझ्या सशक्त बंधूंना जाग नाही येणार ? पाकिस्तान , बांग्लादेश आधीच आपण गमावला आहे, ही भूमीची भूक यांची संपणार नाही आवरल्याशिवाय ! यांच्या पाशवी भूकेसाठी अजून काय काय बळी द्यायला तयार आहे हिंदू ? देव-धर्मसुद्धा बळी देशील ?
विवेकानंद म्हणाले होते या काळात राष्ट्र हीच देव आहे. याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी व जागवावी.